नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
रविवार अक्कलकुवा नवापूर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणातील सरपंच पदाचे तसेच सदस्य पदाच्या उमेदवांरानी व कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नवापुर तालुक्यातील बंधारे येथील सुनील गावित, उंबर्डीचे लहू गावित, संगीता गावित,जयता गावित, कोळदाचे सुमित वसावे, तनुजा वसावे, सविता वसावे, रणजीत वसावे, जुवाचे कमलेश गावित,
रूपसिंग गावित,सारिका गावित, संगीता गावित, कारेघाटचे नेहम्या मावची गोरजी मावची,शमुवेल मावची,बोरपाड्याचे कल्पना गावित,यमुना गावित, रतिलाल गावित,प्रफुल्ल गावीत, खोकसाचे गिरीश गावित ,जहागु गावित, निर्मला गावित, रविता गावित, यांच्यासह असंख्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश दिला.
यावेळी शिवसेनेचे नवापूर तालुक्याचे ज्येष्ठ शिवसैनिक के. टी. गावित यांच्या प्रयत्नातून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले यावेळी हिरामण पाडवी, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, ,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, छोटू हाश्मी, पृथ्वीसिंह पाडवी,पंचायत समिती सदस्य, जेका पाडवी, हाजी हाफिज मक्राणी आदीं उपस्थित होते.








