Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘घरपोच आहार योजने’ला अंगणवाडी कर्मचार्‍यांचा विरोध, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे असहकार आंदोलनाचा इशारा

team by team
August 28, 2021
in राज्य
0

नंदुरबार | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरपासून अमृत आहार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ‘घरपोच डबा’ देण्याचे आदेश बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. परंतु या आदेशामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून या नव्या योजनेला विरोध केला जात आहे. एवढेच नव्हे तर बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातून वाटप करण्यात येणार्‍या अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत काहीअंशी बदल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांना पत्र देण्यात आले आहे. या पत्रात प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थी गरोदर व स्तनदा माता,  दि.१ सप्टेंबरपासून महिला बचत गटामार्फत ताजा व गरम आहार शिजवून घरपोच डबा उपलब्ध करून द्यावा, असे नमुद केले आहे. शिवाय ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना आठवड्यातून ४ वेळा अंडी शिजवून द्यावी असेही सुचित केले आहे.
जिल्हा परिषदेचे पत्र प्राप्त होताच अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये प्रशासन यंत्रणेविरुद्ध संतप्त भावना निर्माण झाली आहे. याबाबत कोरोनाच्या अतिसंवेदनशील परिस्थितीत बालमृत्यू रोखणे व कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी दिलेले योगदान व आम्हाला मिळणार्‍या मोबदल्याची तुलना प्रशासन स्तरावरुन व्हावी अशी अपेक्षा वजा सुचना अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात येत आहे. कोरोना कालावधीत आहार शिजविण्याचा मोबदलाच मिळाला नाही, असे म्हणत अंगणवाडी सेविकांनी स्वतः खर्च करून दुध भुकटी खरेदी केली. अमृत आहार योजनेचा निधी नसतानाही आहार वाटपात नियमितता कशी ठेवली असावी? असा प्रश्नही संघटनेतर्फे उपस्थित केला जात आहे.
कर्मचार्‍यांच्या मागण्यांची फारशी दखल घेतली जात नाही, भ्रष्टाचाराची चौकशी होणे अपेक्षित असताना वेगळेच आदेश काढले जातात, ही बाब अंगणवाडी कर्मचार्‍यांसाठी अन्यायकारक आहे. असे म्हणत एक वर्षानंतर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा नेमका उद्देश काय असाही सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या या अन्यायकारक भुमिकेला राज्यभरातून विरोध होत असून आंदोलन करण्यात येणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे व अमोल बैसाणे यांनी सांगितले.
प्रशासनाला आदर्श सेवेचा विसर
कोरोना कालावधीत नर्मदा काठावरील चिमलखेडी ता. अक्कलकुवा येथील रेलू वसावे या अंगणवाडीसेविकेने स्वतः बोट चालवून नेत गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व बालकांच्या भल्यासाठी सेवा बजावली, त्यांचा नाशिक आयुक्तांकडून सत्कार करण्यात आला, शिवाय देशभर विविध स्तरावरुन गौरवही करण्यात आला.  ही बाब नंदुरबार जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेवेची साक्ष देत आहे. प्रशासनाकडून किमान अशा बाबींचा तरी विचार व्हावा, असे म्हणत प्रशासनाला  कदाचित यांचा विसर पडला असावा असे म्हटले जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दहिंदुलेच्या ईश्वरची ‘माझा होशील ना’ फेम सईशी भेट

Next Post

बोकलझर येथे जि.प सदस्य भरत गावीत यांचा हस्ते ७६ लाभार्थ्यांना खावटी किट वाटप

Next Post
बोकलझर येथे जि.प सदस्य भरत गावीत यांचा हस्ते ७६ लाभार्थ्यांना खावटी किट वाटप

बोकलझर येथे जि.प सदस्य भरत गावीत यांचा हस्ते ७६ लाभार्थ्यांना खावटी किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add