नंदुरबार l
येथील श्रीमती डी.आर. हायस्कूलचे गणित शिक्षक योगेश गवते यांची महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्यावतीने नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
३ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ पदग्रहण समारंभ व जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये योगेश गवते यांना महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव शिवशरण बिराजदार (सोलापूर) व राज्य मंडळाचे गणित तज्ञ प्राचार्य नानासाहेब लामखेडे (जळगाव) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र कदम,
शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. योगेश गवते यांची नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ऍड.परीक्षित मोडक, नरेंद्र सराफ, उपाध्यक्ष राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक तसेच मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यशाळेला उपस्थित असलेले नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणित शिक्षक यांनी अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना योगेश गवते यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कानाकोपर्यामध्ये गणिताची ज्ञानगंगा, गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा परीक्षेच्या निमित्ताने पोहचवणार असून गणिताचा विकास म्हणजेच माझा विकास असे मनोगत व्यक्त केले. व माझ्या या कार्यासाठी जिल्ह्यातील गणित शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.








