नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील वंजारी सेवा संघातर्फे समाजाचे आराध्य दैवत संतश्री भगवान बाबा यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
शहरातील धुळे रस्त्यावरील गांधी नगर भागातील पेन्शनर भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी संतश्री भगवान बाबा यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ महिला शोभा रमेश गवते यांनी पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सौ. सरिता अनिल कागणे यांनी सामाजिक उपक्रमात महिलांनी संघटित होऊन सहभागी होण्याचे आवाहन केले तर संतश्री भगवान बाबा यांच्या जीवन कार्याला जिल्हाध्यक्ष केतन गीते यांनी उजाळा दिला. यावेळी वंजारी सेवा संघाचे विभागीय सहकार्यध्यक्ष देविदास पेटकर यांनी भविष्यात देखील विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. संतश्री भगवान बाबा जयंती निमित्त कोरोना नियमावलीचे पालन करीत साध्या पद्धतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास वंजारी सेवा संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.अर्चना गणेश काकडे, उपाध्यक्षा सौ. सरिता अनिल कागणे, सचिव सौ. विद्या राहुल गाभणे, सहसचिव सौ. सुरेखा देविदास पेटकर, कोषाध्यक्ष सौ.शोभा रमेश गवते, संघटक सौ. सोनाली बंडू गवते, सल्लागार सौ. मनीषा भगवान धात्रक, सौ. सोनाली शैलेंद्र गवते, सदस्या सौ. सरला भटू आघाव, सौ. कविता भूपेंद्र आघाव, सौ. सारिका केतन गीते, सौ. आशा सुरेश सांगळे, पूर्वा राहुल गाभणे तसेच वंजारी सेवा संघाचे विभागीय सहकार्यअध्यक्ष देविदास पेटकर, जिल्हाध्यक्ष केतन गीते, जिल्हा सचिव राहुल गाभणे, उपाध्यक्ष देवेंद्र आघाव, संपर्कप्रमुख लक्ष्मण बांगर, सहसंपर्क प्रमुख दिनेश आघाव, जिल्हा संघटक मोहन सानप, विजय प्रधान आदींसह वंजारी समाजबांधव महिला पुरुष उपस्थित होते. याप्रसंगी संत श्री भगवान बाबा यांच्या भजन कीर्तन गीतांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.