नंदुरबार l प्रतिनिधी
संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन गु्रप महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पंकज अरविंद सोनार व नंदुरबार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल बाळकृष्ण वडनेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन ग्रुप महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने सुवर्णकार समाजाची संस्कृती, भाषा, कला जोपासण्यासह समाजाच्या विकासासाठी कार्य केले जाते. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासह सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन ग्रुप महाराष्ट्र या संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पंकज अरविंद सोनार व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल बाळकृष्ण वडनेरे यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत गोकुळ दाभाडे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. या नियुक्तीबद्दल पंकज सोनार व राहुल वडनेरे यांचे कौतुक होत आहे.