नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य विभाग ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झाले. यात ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शकुंतला शिंत्रे नंदुरबार शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक गवते, शेतकी संघ संचालक सुरेश शिंदे, नंदुरबार चे नगरसेवक गौरव चौधरी,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ओगले,पिंटू भाबड,डॉ.राजेश वसावे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागुल उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात सर्व तज्ञ डॉक्टर मार्फत रुग्णांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या यात ईसीजी, एक्स-रे, सिटीस्कॅन, रक्त तपासणी, डोळे तपासणी,मलेरिया तपासणी मोफत करण्यात आले तसेच सर्व प्रकारचे औषधे रुग्णांना मोफत देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नंदुरबार यांच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या या कार्यक्रमांतर्गत जवळजवळ 350 पेक्षा जास्त रनाळे सह परिसरातील नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घेतली.
यावेळी ग्रामीण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय पवार,डॉ शत्रुघ्न गडदे, डॉ आकाश राजपूत,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमितकुमार पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ जाफर तडवी,डॉ मनोज गावित,डॉ उमेश गिरासे, आरोग्य सेवक हितेंद्र बडगुजर,सुनील पदमोर,प्रकाश धनगर,गणेश देवरे,सहाय्यक अधीक्षक राजेंद्र गिरासे,वृषाल बाविस्कर,
हितेंद्र चौधरी, प्रमोद वैराज,राहुल कसबे,वरसाळे, श्रीमती दुसाने,मनोज पवार,भाऊसाहेब गोसावी,वनिता व्यवहारे,धनश्री पाटील,राकेश वानखेडे, रामू धनगर,जगदीश वानखेडे, आबिद बागवान आदींचे आरोग्य शिबीर संपन्न करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.