नंदूरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेरचे संस्थापक संस्थाध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांचा ७४वा वाढदिवस श्रीमती क.पु पाटील माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला .

याप्रसंगी विजय भास्करराव पाटील कार्याध्यक्ष, एक्सलनसिया डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे, मॅनेजिंग डायरेक्टर सौ.प्राजक्ता विजय बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील , संस्थेच्या सचिव भिका भाना पाटील , भालेरच्या माजी सरपंच तथा संस्थेच्या संचालिका बेबीबाई भास्करराव पाटील ,

संस्थाचालक संघटनेचे समन्वयक सदस्य एन. डी. नांद्रे पंचक्रोशीतील सर्व संस्थेचे हितचिंतक बी के. पाटील, पी .पी. बागुल (माजी पर्यवेक्षक) प्रताप आत्माराम पाटील नानाभाऊ बाबूराव पाटील, वासुदेव आत्माराम पाटील,सुनिल गंगाराम पाटील, राहुल दगा पाटील डाॅ.श्री.व्ही.पी.बोरसे, रमेश पोपट पाटील , देविदास हिरामण.पाटील,
सदा महाराज भिल, माधव जाधाव, हर्षल पाटील,फकिरा गंगाराम पाटील विठोबा माळी ,राकेश माळी, सोपानदेव चव्हाण. प्राचार्य सौ. विद्या चव्हाण , पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर सौ नलिनी नांद्रे, सौ सुमनबाई भिल, भालेर नगाव तिशी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. दीप प्रज्वलन करून औक्षण करून केक कापण्यात आला.प्राचार्य ,पर्यवेक्षक, प्राध्यापिका प्राध्यापक शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.








