नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी नंदुरबार पालिका निवडणूकीत नगराध्यक्ष भाजपाचाच राहणार असेल तरच युतीचा विचार केला जाईल अशा शब्दात माजी आ. शिरीष चौधरी आपली भूमिका मांडत श्री चौधरी यांनी राजकीय स्फोट केला आहे.
नंदूरबार येथे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत आगामी सर्व निवडणुका शिंदे गटासोबत लढवणार असल्याचे सांगितले होते
त्यामुळे शिंदे गटाशी भारतीय जनता पार्टी युती करणार की नाही, याबाबत विविध मते मतांतरे आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी आ. शिरीष चौधरी यांनी जर पालिके वर भाजपाचा नगराध्यक्ष राहत असेल तरच युतीचा निर्णय होईल, अन्यथा नाही. असा खुलासा चौधरी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच नंदुरबार दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. शिरीष चौधरी यांनी केलेले वक्तव्य आणखीनच खळबळजनक ठरणार आहे.








