शहादा l प्रतिनिधी
एन. मुक्ता संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आ.राजेश पाडवी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यातयावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात कार्यरत नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड टीचर असोसिएशनच्या ( एन. मुक्ता संघटनेच्या ) वतीने शहादा – तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले ;
या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या दि. ३१/१०/२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत अथवा शासन अनुदानित सेवेत दि. १/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना” (डी. सी. पी.) लागू केलेली असून त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र नागरीसेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ (अर्थात जुनी पेन्शन योजना) अन्वये असलेल्या निवृत्ती वेतन विषयक तरदुदी पूर्णपणे भिन्न व कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत.
जुन्या पेन्शन योजनेत ठराविक सूत्रानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास हमीचे निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते. कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला त्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याचे सामाजिक जीवन सुरक्षित होते. तसेच देशातील राजस्थान, छत्तीसगड राज्यांनी तसेच झारखंड, दिल्ली व पंजाब सरकार लागू करण्यात डी.सी. पी.एस
व एन.पी.एस. ऐवजी आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केलेली आहे. त्याचे अनुसरून करून महाराष्ट्र शासनाने देखील नवीन अंशतः निवृत्ती वेतन डी.सी. पी.एस व एन.पी.एस. योजनेऐवजी संपूर्ण राज्यभरातील प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन योजना) अर्थात जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करण्यात यावी असे निवेदाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी आ. राजेश पाडवी यांनी , जुनी पेन्शन योजनाची लागू करण्याची मागणी ही न्याय्य असून सदर निवेदन हे महाराष्ट्र शासनाला पर्यंत पोहचवून यावर सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडू असे सांगितले.
याप्रसंगी एन. मुक्ता संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.अरविंद कांबळे , सचिव प्रा. डॉ. भगवान चौधरी , केंद्रीय सदस्य प्रा. डॉ. भारत चाळसे , प्रा.डॉ.विजय शर्मा , कोषाध्यक्ष प्रा. अनिल साळुंके , प्रा. डॉ. अनिल बेलदार , प्रा. डॉ. सुनिल पाठक , प्रा. डॉ. प्रमोद पाटील , प्रा. डॉ. गोपाल गवई , प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे , प्रा.निलेश आठवले , प्रा. डॉ. विजय बर्फे, प्रा. डॉ.योगेश वसू , प्रा.सुधाकर उजगरे , प्रा. राहुल पाटील , प्रा. डॉ. सतीश भांडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.