Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जुनी पेन्शन साठी एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेचे निवेदन

team by team
October 2, 2022
in शैक्षणिक
0
जुनी पेन्शन साठी एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेचे निवेदन
शहादा l प्रतिनिधी
 एन. मुक्ता संघटनेच्या  शिष्टमंडळाच्या वतीने आ.राजेश पाडवी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यातयावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
                अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित आणि  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात कार्यरत नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड टीचर असोसिएशनच्या ( एन. मुक्ता   संघटनेच्या ) वतीने शहादा – तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले ;
या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या दि. ३१/१०/२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत अथवा शासन अनुदानित सेवेत दि. १/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी  केंद्र शासनाच्या धर्तीवर, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना” (डी. सी. पी.) लागू केलेली असून त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र नागरीसेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ (अर्थात जुनी पेन्शन योजना) अन्वये असलेल्या निवृत्ती वेतन विषयक तरदुदी पूर्णपणे भिन्न व कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत.
जुन्या पेन्शन योजनेत ठराविक सूत्रानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास  हमीचे निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते. कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला त्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याचे सामाजिक जीवन सुरक्षित होते. तसेच देशातील राजस्थान, छत्तीसगड  राज्यांनी तसेच झारखंड, दिल्ली व पंजाब सरकार लागू करण्यात डी.सी. पी.एस
 व एन.पी.एस. ऐवजी आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केलेली आहे. त्याचे अनुसरून करून महाराष्ट्र शासनाने देखील  नवीन अंशतः निवृत्ती वेतन  डी.सी. पी.एस व एन.पी.एस.  योजनेऐवजी संपूर्ण राज्यभरातील प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर  सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा  (निवृत्ती वेतन योजना)  अर्थात जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करण्यात यावी असे निवेदाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी आ. राजेश पाडवी यांनी , जुनी पेन्शन योजनाची लागू करण्याची मागणी ही न्याय्य असून सदर निवेदन हे महाराष्ट्र शासनाला पर्यंत पोहचवून यावर सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडू असे सांगितले.
              याप्रसंगी एन. मुक्ता संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.अरविंद कांबळे , सचिव प्रा. डॉ. भगवान चौधरी , केंद्रीय सदस्य प्रा. डॉ. भारत चाळसे , प्रा.डॉ.विजय शर्मा , कोषाध्यक्ष प्रा. अनिल साळुंके , प्रा. डॉ. अनिल बेलदार , प्रा. डॉ. सुनिल पाठक  , प्रा. डॉ. प्रमोद पाटील , प्रा. डॉ. गोपाल गवई , प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे ,  प्रा.निलेश आठवले , प्रा. डॉ. विजय बर्फे,  प्रा. डॉ.योगेश वसू , प्रा.सुधाकर उजगरे , प्रा. राहुल पाटील  ,  प्रा. डॉ. सतीश भांडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

लाभार्थ्यांचे आहार व पोषणात सुधारणा करा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

सैताणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

Next Post
सैताणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

सैताणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add