नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील कोकणी हिल परिसरात असलेल्या मनुदेवी संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपतर्फे टी-शर्ट व क्रीडा साहित्य तसेच स्वादिष्ट भोजनाचे वितरण करण्यात आले.सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ऍड. अल्पेश जैन यांच्या एक हात मदतीचा संकल्पनेतून नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंधेला सदर उपक्रम राबविण्यात आला.
दुधाळे येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले क्रीडा साहित्य आणि आकर्षक टी-शर्ट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. यावेळी सहयोग सोशल ग्रुप तर्फे 30 विद्यार्थ्यांना दर्जेदार टी-शर्ट वाटप करण्यात आले. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला कामाचा व्याप असतो मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून वंचित विद्यार्थ्यांसोबत काही वेळ सहवास घालून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा मानस ऍड.अल्पेश जैन यांनी कृतीतून करून दाखविला.
या सामाजिक उपक्रमप्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सहयोग ग्रुपचे उपाध्यक्ष डॉ.संदीप जैन,नरेश चौधरी, सचिव डॉ.सुनील लोखंडे, कोषाध्यक्ष डॉ.योगेश बडगुजर ,सहसचिव डॉ.महेश मोरे आदि उपस्थित होते, उपक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र सूर्यवंशी, गुड्डू जिरे,रवीद्र चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, पलास जैन,मोईन पिंजारी,सोहेल मंसुरी, राकेश भोई,देवेंद्र चव्हाण,राहूलं पाटील प्रमोद जहांगीर आदींनी परिश्रम घेतले.









