Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
September 24, 2022
in कृषी
0
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील  योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार  l

 

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait. gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.या घटकांत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकु, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

 

फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकरऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

 

कंदवर्गीय फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमान 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल. तर सुटी फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

 

 मसाला पिक लागवड घटकांत बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 30 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तर बहुवर्षीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

 

 

विदेशी फळपिक लागवड घटकांत ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवी फळासाठी शेतकऱ्यास 4 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर स्ट्रॉबेरी फळासाठी शेतकऱ्यास 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तसेच पॅशनफ्रुट, ब्युबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो फळासाठी शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

 

 

तर जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत खर्चांच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.

तरी या घटकांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी कळवले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add