Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
September 24, 2022
in Uncategorized
0
ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार   l

आगामी काळातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुध्द व दर्जेदार मालाचा, पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत त्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे (अन्न), उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिलीप पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, समाधान बारी, प्रदिप वळवी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सव काळात भेसळयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अन्नपदार्थामधील भेसळ कशी ओळखावी यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत प्रत्येक अन्न व्यावसायिकाने अन्न पदार्थ उत्पादन, साठवण, वितरण, वाहतूक व विक्रीसाठी अन्न व परवाना तथा नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकांने नोंदणी करावी. जिल्ह्यातील सर्व अन्न आस्थापनाची नियमित तपासणी कराव्यात. बचत गटांना अन्न परवाना व नोंदणी प्रमाणपत्रे देण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

सहाय्यक आयुक्त श्री. कांबळे यांनी सांगितले, या वर्षांत 1 एप्रिल 2022 पासून अन्न व आस्थापनाची तपासणी करुन नंदुरबार जिल्ह्यात 33 हजार 500  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात येवून या मोहिमेच्या माध्यमातून अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचा प्रोत्साहन भत्ता कपात अन्यायकारक

Next Post

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील  योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add