नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी व परिसरातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या अति दुर्गम भागातील डोंगरात
मुसळधार पाऊस पडल्याने आज दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास
परत विसरवाडी येथील सरपनी नदीला मोठा पुर आल्याने महामार्ग चौपरीकरण काम करणारे म्हात्रे कंपनीने तयार केलेला नदी वरील प्रर्यायी रस्त्या वरुन पुराचे पाणी वाहत असल्यान सकाळ पासुन राष्ट्रीय महामार्गावरील सहा वरील दोघे बाजुने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
जुलै महिण्यापासुन येथे व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे.bसरपनी नदीला पुर येत असल्याने महामार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती. आता सहाव्यादा रस्ता बंद झाला. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत पर्यायी रस्ता एक मोठी समस्या झाली आहे. नदी मध्ये तयार केलेला पर्यायी रस्त्या वरिल भराव मोठे दगडे पुरात वाहुन गेले रस्त्यावर मोठे भगदड पडले आहे.
प्रवासी, वाहन चालक रस्त्यावर अडकून पडले आहे. महामार्गवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अंतरराज्यीय महामार्गावर वाहतूक ठप्प होणे मोठी समस्या बनली आहे या समस्या ला म्हात्रे कंपनी जबाबदार आहे. विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील ,पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, पो.हे.कॉ.दिनेश चित्ते, अनिल राठोड,हेमंत खाडे ,लिनेश पाडवी ,पिंटु पावरा, विशाल गावीत , दारासिंग पावरा राजु कोकणी ,महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ हे.कॉ.नुर पिंजारी, किशोर बागुल दिपक चौधरी यांनी परिश्रम घेवुन नंदुरबार , पिंपळनेर ,नवापूर मार्गे वाहतूक वळविली आहे.सध्या विसरवाडी परिसरात पावसा जोर कायम आहे ,सरपनी नदीचे पात्र 200 फुट लांबीचा असुन देखील म्हात्रे कंपनी कडून ,व्यवस्थित पाहणी न करता एक लहान पर्यायी रस्ता नदी मध्ये चार सिंमेट पाईपे टाकुन त्यावर मरुम माती टाकून तयार केला आहे.
या महामार्गावर दररोज हजोरोच्या संख्येने लहान मोठी अवजड वाहने ये जा करतात ,नदीच्या पुरात हा पर्यायी रस्ता टिकणार कसा ? त्यामुळे सर्वाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरपनी नदी चा जुना पुला तोडुन त्या ठिकाणी नवीन मोठ्या पुलाचे काम गेल्या दोन वर्षां पासून सुरू आहे. अघाप काम अपुर्ण अवस्थेत असल्याने महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी कंपनी विरुद्ध काही कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिक ,वाहन चालक करत आहे.








