Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तालुक्यातील ग्रामपंचायतीत ७५ पैकी भाजप ४२, शिवसेना २८ ,अपक्ष ४ तर १ राष्ट्रवादीचा दावा

team by team
September 19, 2022
in राजकीय
0
नंदूरबार तालुक्यातील ग्रामपंचायतीत ७५ पैकी भाजप ४२, शिवसेना २८ ,अपक्ष ४ तर १ राष्ट्रवादीचा दावा

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज दि.१९ सप्टेंबर रोजी लागला. यात भाजपाचा वर्चस्व दिसून आले. ६९ ग्रामपंचायतीपैकी ३९ भाजपा, २५ शिवसेना (शिंदे गट), १ राष्ट्रवादी तर चार ग्रामपंचायतीवर अपक्ष लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले आहे.

 

 

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. त्यात अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पैकी सुतारे, पथराई व वरूळ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने तर देवपूर नटावद व भवानीपाडा ग्रामपंचायतीवर भाजपाने दावा केला होता.

 

 

 

 

दरम्यान काल दि.१८ सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीसाठी ८२.०९ टक्के इतके मतदान झाले होते. आज दि.१९ रोजी नंदुरबार येथील वखार महामंडळ येथे मतमोजणीत झाली. यात ६९ ग्रामपंचायतीपैकी ३९ भाजपा, २५ शिवसेना (शिंदे गट), ४ अपक्ष तर १ राष्ट्रवादी पक्षाचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहे.

 

 

भाजपा विजयी झालेल्या ग्रामपंचायती
अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धिरजगांव, नवागांव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगळू, मालपूर, लोय, निंबगांव, कोठली, पावला, शिवपुर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगांव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपुर या ग्रामपंचायतीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले.

 

शिवसेना (शिंदेगट) विजयी झालेल्या ग्रामपंचायती
अजयपूर, बिलाडी, हरीपूर, पाचोराबारी, खामगांव, टोकरतलाव, विरचक, वाघाळे, आरर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली या ग्रामपंचयायतीवर शिंदेगटाने विजयी मिळविला आहे.

अपक्ष विजयी 
नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील विजयी उमेदवारांनी अपक्ष निवडून आल्याचे सांगितले तर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर आधी ६ ग्रामपंचायतींपैकी ३ भाजपा व ३ शिंदे गटाने दावा केला. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील झालेल्या ७५ ग्रामपंचायतींमध्ये ४२ ग्रामपंचायती भाजपा, शिवसेना (शिंदेगट) २८, अपक्ष ४ व राष्ट्रवादीचा १, लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे.

 

नंदुरबार दोन भावांमध्ये लढत
नंदुरबार तालुक्यातील धमडाई येथे दोन भावांमध्ये लढत पहायला मिळाली. यात शिंदे गटाच्या शेखर पाटील यांनी बाजी मारली असून रवि पाटील व वसंत पाटील यांचा गटाचा पराभव केला.

आदिवासी विकासमंत्री यांचा पुतणीचा पराभव राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांची पुतणी तथा नंदुरबार पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत यांची मुलगी प्रतिभा जयेंद्र वळवी या दुधाळे ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंचपदासाठी भाजपाकडून उभ्या होत्या. त्यांना शिवसेनेच्या अश्‍विनी प्रकाश माळचे यांनी ५४१ मतांनी पराभव केला. दरम्यान नंदुरबार तालुक्यात लक्ष लागून असलेल्या कोळदे ग्रामपंचायतीत भाजपा तर होळतर्फे हवेली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे. दरम्यान नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांचे गांव असलेले आष्टे गावात भाजपाचा विजय झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाचा वरचष्मा : नंदूरबार तालुक्यातील ४० पैकी १८ ग्रामपंचायतीवर भाजपा विजयी

Next Post

विसरवाडी येथे पुरामुळे सहाव्यांदा वाहतूक ठप्प, महामार्गावरील वाहतूक वळवली

Next Post
विसरवाडी येथे पुरामुळे सहाव्यांदा वाहतूक ठप्प, महामार्गावरील वाहतूक वळवली

विसरवाडी येथे पुरामुळे सहाव्यांदा वाहतूक ठप्प, महामार्गावरील वाहतूक वळवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add