Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नराधमांना सहाय्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व खोटा शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे : विजय चौधरी यांची मागणी

team by team
September 19, 2022
in राजकीय
0
नराधमांना सहाय्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व खोटा शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे : विजय चौधरी यांची मागणी

नंदुरबार |  प्रतिनिधी

विवाहितेवर अत्याचार करणार्‍या संशयित आरोपींना सहकार्य करण्याची भूमिका घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना व खोटा शवविच्छेदन अहवाल देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याला तातडीने निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी,  या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी तसेच पीडितेच्या परिवाराला सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

 

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील खडकी येथे आपल्या विवाहित मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची योग्य चौकशी होत नाही म्हणून पित्याने तिचा मृतदेह तब्बल ४२ दिवस मिठामध्ये काढून ठेवल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्या महिलेला मानसिक त्रास देत चार जणांनी शारीरिक अत्याचार केल्याची खळबळ जनक माहिती देखील समोर आली आहे. या संदर्भाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन माहिती घेतली व या प्रकरणी कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्या मुलीचे वडील यांना दिले.

 

 

त्यानंतर लागली त्वरेने विजय चौधरी यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने निवेदन पाठवून दखल घेण्याची तसेच कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. या निवेदनात विजय चौधरी यांनी म्हटले आहे की,  मयत मुलीचे वडील यांनी धडगांव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत स्पष्ट म्हटले आहे की, संशयीत आरोपी रंजीत ठाकरे आणि त्याचे सहकारी यांनी माझ्या मुलीला चुकीच्या व वाईट हेतूने पळवून नेत अत्याचार करण्यात आले. , परंतु निरीक्षक अवताडे यांनी आर्थिक लाभाच्या आमिषाने संशयित आरोपींना सहाय्य करण्याची भूमिका घेत सामान्य कलम लावले.

 

 

 

मुलीच्या पित्याने असेही म्हटले आहे की त्या मुलीने एक ऑडिओ क्लिप व्हायरल करून माहिती दिली होती.आपल्यावर सिनेस्टाईल अत्याचार करून मारहाण करण्यात आल्याचे तिने त्यात स्पष्ट केले आहे. असे असताना निरीक्षक औताडे आणि सहाय्यक निरीक्षक महाजन यांनी कलम ३०२ आणि कलम ३७६ लावले नाही तसेच धडगाव ग्रामीण रुग्णालयाचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी चुकीचा खोटा शवविच्छेदन अहवाल दिला. यामुळेच तब्बल ४२ दिवस वस्तुनिष्ठ योग्य तपास न होता आरोपी निष्पन्न व्हायला व अत्याचार करून खून केल्याचे सत्य बाहेर येण्यास विलंब होत राहिला. याविषयीची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली तेव्हा मुलीच्या वडिलांना धमकावण्याचे पाप देखील या अधिकार्‍यांनी केले. म्हणून नराधमांना सहाय्य करणारे धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक औताडे आणि सहाय्यक निरीक्षक महाजन यांना तातडीने निलंबित करावे व खोटा शवविच्छेदन अहवाल देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याला तातडीने निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी,

 

 

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी तसेच पीडितेच्या परिवाराला सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

Next Post

शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल अचानक दगावले, पशु मालकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post
शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल अचानक दगावले, पशु मालकांमध्ये भीतीचे वातावरण

शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल अचानक दगावले, पशु मालकांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add