नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील दहीहंडी व इस्तेमा कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रद्द करण्यात आला आहे.याबाबत पोलीस दलाने घेतलेल्या बैठकीत आयोजकांनी नंदुरबार शहरातील दहीहंडी व इस्तेमा होणार नसल्याची ग्वाही दिली.याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन यांनी कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरात मुस्लीम धर्मगुरुतर्फे दि.२७ ते २९ ऑगस्ट दरम्यान धार्मिक प्रवचन / इस्तेमा कार्यक्रम आयोजीत करणार असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या अनुषंगाने दि.२४ ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांनी शहर पोलीस स्टेशन , उपनगर पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मशिदींचे मौलाना ट्रस्टी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.बैठकीत सर्व मौलानांना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे बाबत सुचना देण्यात आल्या.शासनाने ठरवून दिलेल्या नियमां प्रमाणे मशिदमध्ये पुजापाठ करण्याबाबत सुचना देण्यात आल्या . सर्व मौलानांनी पोलीस प्रशासनाच्या सांगितले की, धार्मिक प्रवचन / इस्तेमा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे इस्तेम साठी जे कुपन छापले होते, त्यांचे पैसे देखील परत करणार असल्याची ग्वाही दिली .याबाबत पोलीस प्रशासनातर्फे सर्व मुस्लीम धर्मगुरु यांचे आभार मानण्यात आले. तसेच आगामी दहिहंडीच्या सणानिमित्त शहरातील सार्वजनिक दहिहंडी आयोजक यांना बोलावुन बैठक घेण्यात आली . बैठकीत शासनाकडुन पारीत केलेले नियम सांगण्यात आले.त्यात कोणत्याही प्रकारे दहिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही या बाबत सुचना देण्यात आल्या.त्याप्रमाणे सर्व दहिहंडी आयोजकांनी दहिहंडी कार्यक्रम आयोजन करणार नसल्याचे सांगितले . त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व दहिहंडी आयोजकांचे देखील आभार मानण्यात येत आहेत.