Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माणिकराव दादांचे पार्थिव घरी आणले, परिवाराचे झाले अश्रू अनावर

team by team
September 17, 2022
in राजकीय
0
माणिकराव दादांचे पार्थिव घरी आणले, परिवाराचे झाले अश्रू अनावर
नंदूरबार l प्रतिनिधी 
 नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार लोकसभा मतदार संघातून सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकरावदादा होडल्या गावित यांचे आज दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता नवापूर येथील सुमाणिक चौक येथून राहत्या घरापासून निघणार आहे.
दरम्यान आज सायंकाळी 5.45 वाजे दरम्यान दादांचे पार्थिव शरीर घरी आणण्यात आले.यावेळी परिवाराचे अश्रू अनावर झाले.दरम्यान उद्या  नवापूर बंद ठेवण्यात आले आहे.
मागील आठ दिवसांपासून माणिकराव दादांची प्रकृती खालावली असल्याने नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज सकाळी आठ वाजेदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी खासदार माणिकराव दादा गावित यांनी देशात सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची विक्रमी नोंद केली होती.
त्यामुळे माणिकराव दादांना टॉप टेन खासदार म्हणून ओळखले जात असे. माणिकराव गावित हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्षातून सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.  एक मनमिळाऊ लोकप्रिय खासदार म्हणून माणिकराव गावित यांनी आपली ओळख निर्माण केली होती. माजी खासदार माणिकराव गावित यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य, भाजपाचे नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावित, इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे वडील तर जि. प. सदस्य संगीता भरत गावित यांचे सासरे होते.
बातमी शेअर करा
Previous Post

लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

Next Post

वडवड ते उमर्दे दरम्यान सराफाला 10 लाखात लुटल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
नंदुरबार भालेर रस्त्यावर बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटले, पोलीस मागावर असतांना कार व मुद्देमाल टाकुन चोरटे फरार

वडवड ते उमर्दे दरम्यान सराफाला 10 लाखात लुटल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add