नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या प्रकल्पास माजी ऊर्जामंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्रकल्पास भेट दिली.
याप्रसंगी नंदुरबार रेल्वे स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत केले. याप्रसंगी स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना श्रीमद भगवत गीता भेट स्वरूपात दिली.यावेळी नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या संतश्री आसाराम बापू गौरक्षा केंद्र दोंडाईचातर्फे उत्पादित केलेल्या सात्विक वस्तूंचे प्रदर्शन ग्राहकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
गायीचे गोमूत्र आणि शेणपासून निर्मित विविध आयुर्वेदिक औषधी आणि वस्तूंच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती जाणून समाधान व्यक्त केले.ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उत्पादित केलेल्या आयुर्वेदिक औषधी आणि दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंची विक्री नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरू आहे.ग्राहकांनी या विक्री केंद्रास भेट देण्याचे आवाहन प्रकल्पाचे संचालक रमेश सोनार यांनी केले आहे.









