नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरातून गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन क्र . ( एम.एच.३९, ए.ए.५२७८ ) मधून बुधा मुला ठाकरे व शैलेश शांताराम सोनवणे दोघे रा.शिंदखेडा हे दोघे जण गुरांची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आले.नंदुरबार शहरातील करण चौफुलीजवळ सदरचे वाहन अडविले असता त्यात चार गोवंश आढळून आले.त्यांच्याकडून ३६ हजार रुपये किंमतीचे गुरे व दोन लाख रुपये किंमतीचे वाहन असा दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गुरांच्या वाहतूकीचा परवाना आढळून न आल्याने व दाटीवाटीने वाहतूक केल्याने कारवाई करण्यात आली . याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोकॉ.भटू धनगर यांच्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागविणे , प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ.पवार करत आहेत .