नंदुरबार l
येथील समस्त राजस्थानी ब्राह्मण समाज व ब्राह्मण पंच यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राम्हण समाजातील शिक्षक म्हणून ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.
येथील ब्राह्मण वाडीत पार पडलेल्या आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक मनोज रघुवंशी, डॉ.शिवाजीराव पाटील, गोपाळ शर्मा, नंदुरबार पालिकेचे प्रतोद तथा नगरसेवक चारुदत्त कळवणकर, राधेश्याम शर्मा, राजस्थानी ब्राम्हण समाज अध्यक्ष अनिल शर्मा, ब्राम्हण समाज पंचचे अध्यक्ष अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रस्तावना अनिल शर्मा यांनी मांडली. डॉ.शिवाजीराव पाटील, चारुदत्त कळवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर ओम प्रकाश, मोहनलाल शर्मा, कचरू लालजी, सत्यनारायण शर्मा, कैलास शर्मा, जुगल शर्मा, सौ.आरती व्यास, सौ.नेहा पाठक, श्रीमती गायत्री कुलकर्णी, सौ.रंजना जोशी, सौ.ज्योती गोरे, सौ.सायली मुळे, सौ.मिताली अर्थेकर, सौ.लीना वडाळकर, दिनेश ओझा, सौ.वर्षा शर्मा, डॉ.छाया शर्मा, भरत शर्मा एकूण १७ गुणवंत शिक्षकांचा आदर्श गौरव शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले. आभार अजित कुलकर्णी यांनी मानले.








