Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

team by team
September 12, 2022
in राज्य
0
नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा
नंदुरबार  l
नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने १५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे लोणखेडा येथे आयोजन करण्यात आले आहे.
१५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र राज्य ॲम्येचुअर नेटबॉल असोशिएशन यांच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा नेटबॉल असोसिएशन वतीने दि. १६ ते १८ सप्टेंबर २०२२ दरम्यान अमृतवाहीनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर येथे १५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी मुले/गुली राज्यस्पर्धा होणार आहे. त्याकरीता दि. १४ सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी  सकाळी १० वाजता साने गुरुजी महाविद्यालय, लोणखेडा ता.शहादा जि. नंदुरबार येथे मैदानावर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.
सदर निवड चाचणीत नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक खेळाडू मुले व मुलींचा संघ सहभागी होतील. निवड चाचणीसाठी आधार कार्ड, बोनाफाईड, तीन पासपोर्ट फोटो, जन्मदाखला आदी कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. खेळाडूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन च्या वतीने निवड चाचणीसाठी  जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, कार्याध्यक्ष बळवंत निकुंभ (शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी)
उपाध्यक्ष प्रा. ईश्वर धामणे, सचिव राजेंद्र भोई, सहसचिव योगेश निकुंभ, प्रा. डॉ. अरविंद कांबळे, धनराज अहिरे, कुणाल चौधरी, रोहित गायकवाड, सचिन गोंधळी, दीपेश गायकवाड उपस्थित असणार आहेत. निवड चाचणी संदर्भात अधिक माहिती साठी प्रा. डॉ. अरविंद कांबळे मो.8329956490 व राजेंद्र भोई मो.9075585705 यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारला अधिवक्ता परिषदेत विधीतज्ञांकडून नवोदितांना मार्गदर्शन

Next Post

नंदुरबारला ब्राह्मण समाजातर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

Next Post
नंदुरबारला ब्राह्मण समाजातर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

नंदुरबारला ब्राह्मण समाजातर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add