नंदुरबार l
नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने १५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे लोणखेडा येथे आयोजन करण्यात आले आहे.
१५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र राज्य ॲम्येचुअर नेटबॉल असोशिएशन यांच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा नेटबॉल असोसिएशन वतीने दि. १६ ते १८ सप्टेंबर २०२२ दरम्यान अमृतवाहीनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर येथे १५ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी मुले/गुली राज्यस्पर्धा होणार आहे. त्याकरीता दि. १४ सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी सकाळी १० वाजता साने गुरुजी महाविद्यालय, लोणखेडा ता.शहादा जि. नंदुरबार येथे मैदानावर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.
सदर निवड चाचणीत नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक खेळाडू मुले व मुलींचा संघ सहभागी होतील. निवड चाचणीसाठी आधार कार्ड, बोनाफाईड, तीन पासपोर्ट फोटो, जन्मदाखला आदी कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. खेळाडूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन च्या वतीने निवड चाचणीसाठी जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, कार्याध्यक्ष बळवंत निकुंभ (शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी)
उपाध्यक्ष प्रा. ईश्वर धामणे, सचिव राजेंद्र भोई, सहसचिव योगेश निकुंभ, प्रा. डॉ. अरविंद कांबळे, धनराज अहिरे, कुणाल चौधरी, रोहित गायकवाड, सचिन गोंधळी, दीपेश गायकवाड उपस्थित असणार आहेत. निवड चाचणी संदर्भात अधिक माहिती साठी प्रा. डॉ. अरविंद कांबळे मो.8329956490 व राजेंद्र भोई मो.9075585705 यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या वतीने केले आहे.








