नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कोरीट नाका परीसरातील घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे एकास अटक करण्यात आली असुन, त्याच्या ताब्यातुन ५५ हजार ३३० रुपयांचा मद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.१८ ते दि.२२ ऑगस्ट दरम्यान छगन झगा शिंदे रा. स्वामी समर्थ नगर,कोरीटनाका नंदुरबार यांच्या घराच्या दरवाजाच्या कडी सरकवुन घरात आत प्रवेश करून लोखंडी पेटीचा कडीकोंयंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्यानेे ५० हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहे म्हणुन नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील जी.टी.पी कॉलेजच्या मागील भिलाटी परिसरात विजय ऊर्फे देवा तुळशिराम ठाकरे रा.चिंचपाडा भिलाटी नंदुरबार हा संशयीत रित्या फिरत असल्याने त्यास साध्या वेशात जावून ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत येथे आणले व त्याची विचारपुस केली असता त्याने हा गुन्हा हा स्वत: केला असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या समक्ष त्याने त्याचे खिशातील ५५ हजार ३३० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने काढुन दिले. ते दागिने हस्तगत करुन मालमत्ते विरुध्दचा घरफोडी सारखा गंभीर गुन्हा तात्काळ उघडकिस आणल आहे. संशयीत आरोपी व गुन्ह्यातील चोरीस गेलेले ५५ हजार ३३० रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश मोरे , दादाभाई मासुळ , पोलीस शिपाई आनंदा मराठे , अभय राजपुत यांचे पथकाने केली आहे.