नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील सोरापाडा येथून मोटार मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत. याप्रकरणी अनोळखंविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठा यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुकरमुंडा तालुक्यातील चोखीआमली येथील रमेश सोम्या वळवी हे दुचाकी (क्र.एम.एच.३९-एल.२३३०) सोरापाडा येथे गेले होते. यावेळी त्यांनी बहिणीच्या घरासमोर मोटारसायकल उभी केली असता चोरटयाने सदरची दुचाकी चोरटयाने सदरची दुचाकी लांबविली. याबाबत रमेश वळवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ.गोविंद जाधव करीत आहेत. तसेच सोरापाडा येथ्ील रोहितसिंग अलखराम परिहार यांनी घरासमोर दुचाकी (क्र.जी.जे.०७- एडी ९१८४) उभी कली होती. चोरटयाने सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत रोहितसिंग परिहार यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.