नंदुरबार | प्रतिनिधी
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा, तालुका नवापूर येथे विश्व संस्कृत दिवस संस्कृत भाषेतुनच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य बी. एम. निकुभ यांनी सरस्वतीचे प्रतिमा पूजन केले. त्यानंतर विद्यार्थीनींनी स्वागत गीत म्हटले. शाळेचे शिक्षक प्रेमल पाडवी, प्रदीप देसले,ज्येष्ठ शिक्षिका विजया न्हायदे हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रेमल पाडवी ,विजया न्हायदे मॅडमांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थिनीं रोहिणी वसावे ,सृष्टी चिंचोले , स्नेहल वसावे, रोशनी व्यवहारे यांनी संस्कृत भाषेतुन मनोगत व्यक्त केले मेहक गावित या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक संदीप महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शुभम परदेशी, प्रमोद चिंचोले यांचे सहकार्य लाभले.