Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असली येथे चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने राबविला एक मतदार चार झाड उपक्रम, सात हजार रोपांची करण्यात आली लागवड

Mahesh Patil by Mahesh Patil
August 23, 2021
in सामाजिक
0
असली येथे चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली  ग्रामपंचायतीने राबविला एक मतदार चार झाड उपक्रम, सात हजार रोपांची करण्यात आली लागवड
धडगाव  | प्रतिनिधी
अवघा सातपुडा बोडका होत असला तरी पर्यावरण संवर्धनाची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ समाजसेवक तथा आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी यांचे वडील चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली असली ता. धडगाव येथील जंगल मात्र कायम राहीला आहे. असे असतांनाच असली ग्रामपंचायतीमार्फत बाबांच्याच संकल्पनेतून एक मतदार चार झाड उपक्रमांतर्गत सात हजार रोपांची लागवड करण्यात आली. त्यामुळे असलीच्या वैभवात दुपटीने भर पडणार आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध सातपुड्यात व्यावसायिक प्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे सातपुडा बोडका झाला. परंतु धडगाव तालुक्यातील असली व अस्तंबा भागातील जंगल मात्र त्याला अपवाद ठरतो. झाडांचे संगोपन व संवर्धनासाठी आदिवासी विकास मंत्र्यांचे वडील चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. दक्ष ग्रामस्थांमुळे या भागात पर्यावरणास हानिकारक प्रवृत्तीचा शिरकाव होऊ शकला नाही,  कुर्‍हाडबंदी नियमांची अंमलबजावणी केल्याने वर्षानुवर्षे वाढलेल्या झुडूपांसह मोठी झाडेही चांगली वाढली आहे. परिणामी असलीचे नैसर्गिक सौंदर्य आजही शाबूत आहे. एवढेच नव्हे तर तेथील वनउपजही कायम राहीले आहे. जंगलाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला गेल्याने असली गावासह परिसरात दुष्काळ व उष्ण तापमान अशा मानवी जिवनावर परिणाम करणार्या समस्या उद्भवत नाही. यात चांद्याबाबा पाडवी यांची भुमिका महत्त्वाची ठरते.  असे असतानाही ग्रामपंचायतीने नागरिकांच्या श्रमदानातून महू व चारोळीचे ३ हजार ५३० तर आंब्याची ३ हजार ४०० अशी एकूण ६ हजार ९३० झाडांची लागवड करण्यात आली.
अर्थचक्राला मिळेल बळकटी
यंदाच्या वृक्षलागवडीत महू, चारोळी व आंब्याचा समावेश आहे. त्यातील महूचे झाड आदिवासींसाठी कल्पवृक्ष ठरत असल्याने या नव्या रोपट्याचा भविष्यात मोठा आधार लाभणार आहे. कुटुबाची आर्थिक परीस्थीती सुधारण्यास मदत होऊन दरडोई उप्तन्न वाढेल व रोजगार उपलब्ध होईल. तर चारोळी व आंबा ही झाडे आदिवासींच्या अर्थचक्राला आकार  देणारे असून भविष्यातील आर्थिक अडचणी दूर होणार आहे. यासह प्राकृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.
असलीच्या जंगल संवर्धनात मोलाची भुमिका घेणारे चांद्याबाबा पाडवी यांनी पर्यावरणाचा समतोल ढासळू दिला नाही. शिवाय त्यांनी परंपरेतील पोषाख न बदलता आदिवासी संस्कृतीची ओळख शाबूत ठेवली, याबद्दल नुकताच आदिवासी एकता परिषदेने मोख या. धडगाव येथील कार्यक्रमात त्यांचा गौरव केला.
यावेळी वृक्षलागवड प्रसंगी प.स. सदस्य गीता चांद्या  पाडवी.चांद्या बाबा पाडवी, प्रशासक  सि.डी राठोड, ग्रामसेवक विवेक नागरे, छगन पाडवी, गोमा वळवी, दित्या वळवी, धना वळवी, गणेश पाडवी, मोतीराम वळवी,  किरसिंग वळवी,किसन वळवी. वन्या वळवी, राज्या वळवी,  निता पाटील  , श्री.गावीत व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

वारस दाखला तसेच जन्म मृत्यू नोंद दंडाधिकारी यांच्या मार्फत देण्याची आ.राजेश पाडवी यांची मागणी

Next Post

वनवासी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस साजरा

Next Post
वनवासी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस साजरा

वनवासी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

March 26, 2023
नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

March 26, 2023
शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

March 26, 2023
माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

March 26, 2023
गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

March 26, 2023
नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

March 26, 2023

एकूण वाचक

  • 2,964,912 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group