Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील ७३ मंडळांकडून आज गणरायाला निरोप, पाचव्या दिवशी २५८ मंडळांकडून विसर्जण, तगडा बंदोबस्त

team by team
September 4, 2022
in राज्य
0
जिल्ह्यातील ७३ मंडळांकडून आज गणरायाला निरोप, पाचव्या दिवशी २५८ मंडळांकडून विसर्जण, तगडा बंदोबस्त

नंदुरबार   l

नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकूण ८६० मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आलेली होती काल पाचव्या दिवशी जिल्हाभरात २५८ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. यामध्ये ७६ सार्वजनिक, १३६ खाजगी तर ४६ एक गाव एक गणपतींचा समावेश होता. तर उद्या गौरी विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यातील ७३ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येत आहे. यामध्ये ६० सार्वजनिक, ८ खाजगी तर एक गाव एक गणपती असे ५ गणपती मंडळांचा समावेश आहे.

शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी सर्व नियम शिथील करण्यात आल्याने कोरोनानंतर प्रथमच जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी जिल्ह्यात ८६० मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.

यात ४२३ सार्वजनिक, ३३८ खाजगी व ९९ एक गाव एक गणपतींचा समावेश आहे.यामध्ये आठ टप्प्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतींमध्ये एका मंडळाकडून गणरायाचे विसर्जन करण्यात आले होते. तिसर्‍या दिवशी चार मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला.

काल दि.४ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी २५८ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. यात ७६ सार्वजनिक, १३६ खाजगी तर ४६ एक गाव एक गणपतींचा समावेश आहे. तर उद्या दि.५ रोली जिल्हाभरात एकूण ७३ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार शहर पोलिस ठाणेंतर्गत २८ सार्वजनिक व १ खाजगी, उपनगर पोलिस ठाणेंतर्गत १४ सार्वजनिक, १ खाजगी व १ एक गाव एक गणपती, नवापूर पोलिस ठाणेंतर्गत ५ खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

विसरवाडी पोलिस ठाणेंतर्गत २ सार्वजनिक, म्हसावद पोलिस ठाणेंतर्गत ४ एक गाव एक गणपती, तळोदा पोलिस ठाणेंतर्गत १६ सार्वजनिक तर एक खाजगी मंडळाकडून गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. असे जिल्हाभरात ६० सार्वजनिक, ८ खाजगी तर ५ एक गाव एक गणपतींना निरोप देण्यात येणार आहे.

दरम्यान गणरायाच्या विसर्जनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक पोलिस अधिक्षक, एक अप्पर पोलिस अधिक्षक, सहा पोलिस उपअधिक्षक, १९ पोलिस उपनिरीक्षक, ६१ सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, ७२९ पोलिस अंमलदार, १०४ महिला पोलिस अंमलदार, ५ स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीपी, दोन क्यूआरटी, एक एसआरपीएफ कंपनी तर ६०० होमगार्ड असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने चोख पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे मूर्तिकारचा सन्मान

Next Post

बेताल लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी आवर घाला

Next Post
बेताल लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी आवर घाला

बेताल लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी आवर घाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add