धडगांव | प्रतिनिधी
भोईराज सार्वजनिक गणेश मित्र मंडळ धडगाव व श्वेता रुरल फाऊंडेशन धडगाव यांचा संयुक्त विद्यमानाने धडगाव शहरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली.यावेळी शहरातील १०१ रक्त दात्यांनी रक्त दान केले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन धडगाव शहराचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांचा हस्ते करणयात आले.जनकल्याण रक्तपेढी नंदुरबार यांना रक्त देऊन भोईराज सार्वजनिक गणेश मित्र मंडळ धडगाव व श्वेता फाऊंडेशन धडगाव यांनी मोठा आदर्श समाजापुढे मांडला.
यापुढेही नंदुरबार जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवला तर वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रशासनाला सहकार्य करू असे भोईराज सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष धनराज ढोले यांनी म्हटले आहे.
या वेळी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ राजेश केसवाणी,जनसंपर्क अधिकारी आकाश जैन लॅब टेक्निशियन विशाल वारूडे,मनीष पवार,राजेंद्र पावरा,सहायक गोरख भिल यांनी भोईराज गणेश मंडळाचे व श्वेता रुरल फाउंडेशनचे यांचे आभार मानले.
या प्रसंगी श्वेता रुरल फाउंडेशन अध्यक्ष लतेश मोरे,भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मंडळाचे उपाध्यक्ष संजय साठे,सचिव करण खेडकर, चेतन साठे,विजय मोरे,मनोज वानखेडे, मनीष साठे,हर्षल शिवदे, संदीप सूर्यवंशी, इ मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.








