Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे 13 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

team by team
September 4, 2022
in शैक्षणिक
0
रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे 13 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातून 13 शिक्षकांना रोटरी गुणवंत शिक्षक पुरस्कार तर 2 संस्था चालकांना गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
     गेल्या दोन वर्षापासून रोटरी क्लब नंदनगरी च्या माध्यमातून दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन कुठलाही प्रस्ताव न मागवता स्थापन केलेल्या समितीच्या निरीक्षणातून गुणवंत शिक्षकांची निवड केली जाते. त्यातूनच 2022 या वर्षाच्या रोटरी गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी 13 शिक्षकांसह 2 संस्था चालक यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती रोटरी क्लब नंदननगरीचे  अध्यक्ष अनिल शर्मा, सचिव किरण दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन मनोज गायकवाड यांनी कळविले आहे. या गुणवंत शिक्षक पुरस्कारात पुढील शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यात प्रा.डॉ.दिलीप रामभाऊ जगताप (जी.टी.पी. महाविद्यालय नंदुरबार), सुनील वसंत भामरे (मुख्याध्यापक जीवन विद्या माध्यमिक विद्यालय बोरचक ता. नवापूर), हिम्मतराव काशीराम चव्हाण (मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल अक्कलकुवा ता. अक्कलकुवा), धर्मेंद्र भानुदास भारती (श्री आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण, ता.जि.नंदुरबार),  केशव रामचंद्र राजभोज (हि. गो.श्रॉफ हायस्कूल नंदुरबार), शेख शब्बीर मोहम्मद मंसुरी (माध्यमिक शिक्षक नॅशनल हायस्कूल ता.तळोदा), श्रीमती अर्चना छबुगिरी गोसावी (राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार), सुनील नारायण सोनवणे (जि.प.शाळा शेगवे, ता.नवापूर), भारती प्रकाश रनाळकर (जि.प.शाळा, अंबारीबार ता.अक्कलकुवा), यशवंत भटू बोरसे (मोहनसिंग क. रघुवंशी प्राथमिक शाळा, नंदुरबार), शिरीष पवार (नगरपालिका शाळा क्रमांक 4, नंदुरबार), सुरेश नरसई पटेल (के.डी.गावित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोरीट ता. शहादा) तर गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून संजय साहेबराव भामरे (महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल नंदुरबार) यांचा समावेश करण्यात आला आहे.
      याशिवाय शिक्षण क्षेत्रात काम करणारे संस्थाचालकांच्या भूमिकेतून मोलाचे कार्य करणाऱ्या संस्थाचालकांना देखील शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या माध्यमातून गौरविण्यात येते. यंदा
हिरा प्रतिष्ठान नंदुरबार चे अध्यक्ष डॉ.रवींद्र हिरालालजी चौधरी व नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार चे अध्यक्ष परीक्षित मोडक यांना गुणवंत संस्था चालक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी देखील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या माध्यमातून विविध संस्था चालकांना गौरविण्यात आले आहे.
ज्यात नंदुरबार तालुका विधायक समितीचे मनोज रघुवंशी, जिजामाता शिक्षण संस्थेचे डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक  मंडळ शहादाचे प्रा.मकरंद नगीन पाटील, श्री गोवर्धनसिंगजी शैक्षणिक सेवा  समिती,नंदुरबार चे पुष्पेंद्र गोवर्धन रघुवंशी यांना गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
     शिक्षण क्षेत्रातील सदर पुरस्कारासाठी शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच सामाजिक योगदानाची देखील दखल घेण्यात आली आहे असे अध्यक्ष अनिल शर्मा व सेक्रेटरी किरण दाभाडे यांनी कळविले आहे. या वेळी रोटेरियन युवराज पाटील, रमाकांत पाटील, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली, दिनेश साळुंके, डॉ. विशाल चौधरी, निलेश तंवर, असिस्टंट गव्हर्नर शब्बीर मेमन, डिस्ट्रिक्ट लिटरसी हॅपी स्कूल चेअरमन नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येईल असे कळविण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

गणेशोत्सवानिमित्त मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे १०२ नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस

Next Post

धडगावात १०१ रक्तदात्याचे रक्तदान

Next Post
धडगावात १०१ रक्तदात्याचे रक्तदान

धडगावात १०१ रक्तदात्याचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add