नंदुरबार l
येथील मातृवंदना प्रतिष्ठान माळीवाडा परिसर, जिल्हा आरोग्य विभाग आणि यशवंत गायतोंडे मेडिकल अँड रिसर्च एज्युकेशन केअर यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवा निमित्त कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सुमारे १०२ नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
यावेळी १२ ते १४ वर्ष वयोगट साठी कार्बोवॅक्स, १५ ते १७ वयोगटासाठी को-वॅक्सीन आणि १८ वर्षावरील व्यक्तींना कोविशिल्डची तसेच बुस्टर डोसची लसही देण्यात आली. यावेळी लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी समाजापयोगी कार्यक्रम घेण्यात येतात.
यावर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून सदर कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्याचे आले. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांना परिसरातील नागरीकांच्या घरी जावून लसीकरणाबाबत विचारणा केली. आणि त्यांना कोरोना लसीकरणाबाबत प्रोत्साहीत केले. शिबिर यशस्वीतेसाठी मातृवंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र माळी, उपाध्यक्ष राहुल माळी, सचिव जगदीश वंजारी, नरेंद्र माळी, हेमंत माळी, मनोज माळी, रोहित जैन, प्रतीक माळी, विक्की माळी, विशाल माळी, हरीश माळी, भूषण माळी, रमाकांत बागुल, रोहीत माळी, सचिन माळी, राजा माळी, योगेश माळी, नरेंद्र माळी तसेच आशा वर्कर कल्पना चौधरी, सुरेखा टेणेकर, उर्मिला कोकणी, पुजा कदम, गीतांजली पगारे आदींनी परिश्रम घेतले.








