मोड l
मोड आणि परीसरात असलेल्या गावांमध्ये विज वितरण कंपनी गेल्या जुन महिन्यांपासून प्रत्येक गावातील घरगुती विज वापर ग्राहकांना भरमसाठ विजबिल देऊन मनमानी पद्धतीने विज ग्राहकांना छळण्याचा प्रकार सुरू आहे. तरी संबंधित विज वितरण कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे घरगुती विज वापर करणारे ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी दि. ११ जुलै २०२२ रोजी सहायक जिल्हाधिकारी डॉ मनैक घोष यांना निवेदन दिले आहे.
तरी अजून पर्यंत दखल घेतली गेली नाही त्यामुळे विज वितरण कंपनीने मोड येथिल घरगुती विज वापर ग्राहकांना वाढिव विजबील देण सुरू आहे.मोड येथिल अपंग असलेल्या सतिश भगवान उगले या ग्राहकाला ७५००० विज बिल देऊन मनमानी कारभार सुरू आहे. तसेच मोड येथिलच घरगुती विज वापर करणारे शेतमजूर ग्राहक गणेश शिवदास गांगुर्डे यांना ४०,००० तर, रामदास ओंकार चव्हाण (कुंभार) हे जेष्ठ नागरिक असुन घरात दोन व्यक्ती राहतात यांना ३५००० विज बिल आले आहे.
तरी हातावर पोट असणाऱ्या या ग्राहकांनी विज बिल भरले नाही त्यामुळे अशा अनेक ग्राहकांची विजपुरवठा खंडीत झाला आहे तरी अशा प्रकारे परीसरात असलेल्या मोड,मोहिदा,रांजणी प्रतापुर, गावातील ग्राहकांसमोर पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी कि भरमसाठ विज बिल भरावे अशा मनःस्थितीत असणारे ज्या ग्राहकांनी विज बिल भरले नाही त्यांच्या विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे तरी या ग्राहकांना गोडेतेल चा दिवा लावून उजेडात रहावे लागत आहे.
शासनाने २०१९ पासून दिवाबत्ती साठी अनुदानित केरोसिन बंद केले आहे त्यामुळे गोडेतेल चा वापर खंडीत विजपुरवठा झालेल्या ग्राहकांना करावा लागत आहे. तरी वाढिव विजबील संदर्भात शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने या विज वितरण कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे घरगुती विज वापर ग्राहकांना दर महिन्यात प्रत्येक गावातील ५० ,६० ग्राहकांना भरमसाठ विजबिल देऊन पिळवणूक केली जात आहे त्यामुळे अशा ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे विज बिल दुरूस्ती चा नावाखाली ५०% विज बिल भरायला सक्ती केली जात आहे अन्यथा विजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
घरगुती विज वापर ग्राहकांमध्ये विज वितरण कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे विज वितरण कंपनी कर्मचारी आणि घरगुती विज वापर ग्राहक यांच्यात तु तू मै मै होत आहे त्यामुळे विज वितरण कंपनीने घरगुती विज वापर ग्राहकांना भरमसाठ विजबिल देणं थांबवावे हि अपेक्षा घरगुती विज वापर ग्राहकांना आहे.








