Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कासारेत मंत्री भुसेंना शेतकर्‍यांनी दाखविले काळे झेंडे, कांदाप्रश्नासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

team by team
September 4, 2022
in क्राईम
0
कासारेत मंत्री भुसेंना शेतकर्‍यांनी दाखविले काळे झेंडे, कांदाप्रश्नासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन
नंदूरबार  । प्रतिनिधी
कासारे ता.साक्री येथे एका कार्यक्रमात राज्याचे बंदरे व खणीकर्म मंत्री ना. दादा भुसे हे काल जिल्हा दौर्‍यावर आले असता त्यांना शेतकर्‍यांच्या असंतोषाला  सामोरे जावे लागले.  कांदाप्रश्नी  आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत पन्नास खोके, मंत्री ओके अशा घोषणा  दिल्या. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान त्या शेतकर्‍यांची समजूत काढण्यात आली.
साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आज ना. दादा भुसे हे आले होते. विकास कामांचे लोकार्पण सुरू असतानाच अचानक काही शेतकर्‍यांनी ना. दादा भुसेंना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. कांद्याला हमी मिळावा व कासारे ते नामपूर रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
संताप व्यक्त करणार्‍या शेतकर्‍यांना ना.भुसे यांनी जवळ बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघावे, असे त्यांनी सुचविले. कांद्याला भाव मिळत नाही.
शेतकर्‍यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अद्याप साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नसल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर ना. भुसे यांनी आंदोलक शेतकर्‍यांना मंचावर बोलवून त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांची समजूत काढली.
बातमी शेअर करा
Previous Post

स्तुत्य उपक्रम : धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण फोटोग्राफर संघाने घेतला पोस्ट विमाचा लाभ

Next Post

मोड येथिल अपंग ग्राहकाला विज वितरण कंपनीने घराच बिल दिले पाऊण लाख रुपये

Next Post
मोड येथिल अपंग ग्राहकाला विज वितरण कंपनीने घराच बिल दिले पाऊण लाख रुपये

मोड येथिल अपंग ग्राहकाला विज वितरण कंपनीने घराच बिल दिले पाऊण लाख रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add