नंदुरबार | प्रतिनिधी
आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वा खाली युवासेना कार्यकारीणी सदस्या व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या शितल देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रात युवती सेनेतर्फे रक्षाबंधन सण साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नंदुरबार युवती सेनेतर्फे नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी युवती सेनेच्या पदाधिकारी तसेच महिला पोलिस कर्मचार्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना औक्षण करून व राखी बांधून भाऊ बहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी शहर पोलीस निरीक्षक अर्जुन पटले ,पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, मुकेश पवार युवतीसेनेचे जिल्हाध्यक्ष मालती वळवी , शहर अध्यक्ष काजल मच्छले, धनश्री तमायचेकर, आश्विनी घमंडे, लकी घमंडे ,डॉ. अविनाश पाटील, रश्मी पाटील, जय अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार, जगदीश पवार, अशोक सूर्यवंशी, जगन कोकणी,पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बोराळे, शैलेंद्र माळी, हेमंत बारी, प्रफुल अहिरराव ,उमेश वारे, भालचंद्र जगताप ,शुभांगी पाटील, रत्ना जाधव, किरण अहिरे ,गणेशा गावित आदी उपस्थित होते. यावेळी नंदुरबार शहरातील सर्व हॉस्पिटल, शहर वाहतूक शाखा ,शहर पोलीस स्टेशन ,बस स्टॅन्ड आदी ठिकाणी युवती सेनेतर्फे कर्मचार्यांना राखी बांधण्यात आल्या.