नंदुरबार | प्रतिनिधी
मंदिराच्या मोकळया जागेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत विचारणा केल्यातून एकास जीवेमारण्याची धमकी दिल्याची घटना पिंगाणे येथे घडली. याप्रकरणी १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील गोपाळकृष्ण मंदिर संस्थाच्या मोकळया जोत बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले. या अतिक्रमण केल्याबाबत विचारणा केलयातून भगवान दशरथ पाटील यांच्या अंगणावर धावून जात संशयीतानी जीवेमारण्याची धमकी दिली. याबाबत भगवान पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मधुकर बन्सी भोई, संतोष देवराम भोई, भरत शामा भोई, नामदेव काशिराम भोई, बापु सुकदेव भोई, पप्पु मोहन भोई, पांडुरंग शांतीलाल भोई, राजु सुकलाल भोई, हिरामण मगन भोई, जगदिश नामदेव भोई या १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.