तळोदा ! प्रतिनिधी
आजच्या काळात अनेक कुटुंब हे विभक्त होतांना दिसून येत असतात मात्र तळोदा शहरातील सोनगडवाला परिवार हे अपवाद ठरलं आहे. परिवारातील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १९ बहिणी व ११ भावंडांचे कुटुंब हे आपल्या वडिलांच्या वर्षाश्रध्दानिमित रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एकत्र आलेत आणि आपल्या घरामध्येच मोठ्या आनंदाने अनोखा उत्सव साजरा केला असून या सोनगडवाला परिवाराची या रक्षबांधनाची तळोदा शहरात चर्चा होत आहे.

तळोदा येथील स्व. नवणीतलाल हरकलाल वाणी (सोनगडवाला) यांचे दि.२० ऑगस्ट ला वर्षश्राद्ध होते या निमित्ताने यांच्या परिवारातील एकूण १९ बहिणी व ११ भावंडे एकत्र आले व दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२१ ऑगस्ट च्या दिवशी या सर्व बहिणींनी आपल्या भावंडांना रक्षाबंधनाचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला. या एवढ्या मोठ्या परिवारांचे एकमेकांशी प्रेमाचे ,जीवाभावाचे संबंध आहेत. यामध्ये कुटुंब प्रमुखांनी आपल्या जीवनाची शताब्दी पुर्ण करुन ह्या जगाचा निरोप घेतला , श्री नवनीत भाई चे आजसुद्धा त्याच्या प्रथम पुण्य तिथिला एकत्र येऊन, तो दिवस आणि ” पुण्यतिथी” योग्य सन्मान देऊन थाटामाटात साजरी केली,आणि भाऊ बहिणींनी” रक्षाबंधनाच्या पावन दिवशी राखी बांधली ,असा आदर्श समाजा पुढे ठेवणारे अशे हे ” नवनितलाल सोनगड वाला ” परिवार हे पहिलेच कुटुंब म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्या कोरोना महामारी च्या काळात पण एकत्र येऊन आपल्या वडिलांच्या पुण्य तिथीला ” श्रद्धांजली ” अर्पण केली.ते कौतुकास्पदच म्हणावे लागेल.यावेळी त्यांचे जावई, भाचे, भाची नातू, वहिनी असे सर्व कुटुंब उपस्थित होते.