शहादा | प्रतिनिधी
बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून देण्याची प्रतिज्ञा सारंगखेडा ( ता. शहादा ) येथील तरुणांनी केली आहे. त्यासाठी उद्या . ता. २३ ऑगस्टला येथे होणार्या लसीकरणात केवळ भगिनींसाठी लसीकरण, असे नियोजन करण्यात आले आहे. यात सरपंचासह सर्वांनीच सक्रीय सहभाग नोंदवण्याचे ठरवले आहे.
लसीकरण केंद्रावर लस येणार असल्याचे कळताच आपला क्रमांक पहिला लागला पाहीजे यासाठी पहाटे पासूनच अनेक ठिकाणी रांगा लागत आहेत . गर्दी वाढल्याने रेटारेटीत नागरिकांमध्ये गोंधळ वाढतो . अशा वेळी पोलीसांना पाचारण करावे लागते . तेव्हा कुठे गोंधळ थांबतो ही परिस्थिती सर्वत्र आहे . म्हणून रक्षाबंधनासाठी भावाला राखी बांधण्यासाठी गावाला आलेल्या बहिणीसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून देण्याची प्रतिक्षा सारंगखेडा येथील सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांचा सह गावातील तरुणांनी घेतली . त्यासाठी उद्या दि. २३ ऑगस्टला येथे होणार्या लसीकरणात केवळ भगिनींसाठी लसीकरण , असे नियोजन करण्यात आले आहे .
गावात व्हॉटस् अँप वर आवाहन
रक्षाबंधना निमित्त गावाला आलेल्या भगिनींना गावातील भावांकडून भेट म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून देणे . यासाठी सकाळी जिल्हा परिषद मराठी शाळेतील लसीकरण केंद्रात आधार कार्ड घेऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .