Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलिस दलातर्फे ‘गणराया’ पुरस्कार : जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

team by team
August 31, 2022
in क्राईम
0
पोलिसांनी उभारलेल्या शिक्षणसेतु नंतर शिक्षकाने व्यक्त केलेल्या भावना होत आहे सोशल मीडियावर व्हायरल

नंदुरबार l

नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे या वर्षापासून गणेशोत्सव काळात गणेश मूर्तींची स्थापना, विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांना गणराया पुरस्कार देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात गणेश मूर्तींची स्थापना, विसर्जन मिरवणुकीचे वेळी मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांना या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी निवड करताना निकषांचा विचार करण्यात येईल. त्यात, गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, स्थापना व विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे,

उत्कृष्ट देखावा सादर करणे. वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबवणे, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे बसवणे, पोलिस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ आदी निकषांचा विचार करुन पुरस्कारांसाठी मंडळांची निवड करण्यात येईल. गणेश मूर्तींची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत तसेच मोठ्या मंडळांच्या ठिकाणी स्थापना काळात भक्तांच्या दर्शनासाठी स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.

त्यात महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी व पोलीस मोबाईल व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

पुरस्कारप्राप्त गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ असे ५ पुरस्कार देण्यात येतील. याबाबत प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर वकील, प्राध्यापक, डॉक्टर यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती सर्व मंडळांचा आढावा घेवून पुरस्काराची शिफारस करेल. तसेच हा पुरस्कार पारदर्शीपणे देण्यात येईल, अशी माहितीही जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी १४५ तर सदस्यांसाठी ४८६ नामांकन अर्ज दाखल

Next Post

शहादा येथील पोलीस वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे, जिल्ह्यातील पहिलेच ठरले पोलीस वाहन

Next Post
शहादा येथील पोलीस वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे, जिल्ह्यातील पहिलेच ठरले पोलीस वाहन

शहादा येथील पोलीस वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे, जिल्ह्यातील पहिलेच ठरले पोलीस वाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add