Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी १४५ तर सदस्यांसाठी ४८६ नामांकन अर्ज दाखल

team by team
August 31, 2022
in राजकीय
0
शहादा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी १४५ तर सदस्यांसाठी ४८६ नामांकन अर्ज दाखल

शहादा

l
तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात अलोट गर्दी झाली. सरपंच पदासाठी १४५ तर सदस्यांसाठी ४८६ नामांकन अर्ज दाखल झाले. दरम्यान, नामांकन दाखल करण्यासाठी सुटी वगळता एकच दिवस शिल्लक आहे.1 सप्टेंबरला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून उमेदवार व समर्थकांनी तहसील आवारात नेमून दिलेल्या पार्किंगच्या जागेवरच शिस्तीने वाहने उभी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.

शहादा तालुक्यात ७४ ग्रामपंचायतींचा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापले आहे. ७४ ग्रामपंचायतींसाठी २४६ वार्ड आहेत. निवडणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू असून तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले आहे.

नामांकन सादर करण्यासाठी इच्छुकांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयात गर्दी झाली. चारचाकी वाहनात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज सादर केले. ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष ,शहराध्यक्ष कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालयात हजेरी लावतांना दिसत आहे.

या निवडणुकीत निवडणूक निरीक्षक म्हणून प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी काम पाहत आहेत. निवडणूक शाखेतील नायब तहसीलदार राजेंद्र नांदोडे व कर्मचारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

आईवडील हेच खरे जीवनातील पहिले दैवत : पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी

Next Post

नंदुरबार पोलिस दलातर्फे ‘गणराया’ पुरस्कार : जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

Next Post
पोलिसांनी उभारलेल्या शिक्षणसेतु नंतर शिक्षकाने व्यक्त केलेल्या भावना होत आहे सोशल मीडियावर व्हायरल

नंदुरबार पोलिस दलातर्फे ‘गणराया’ पुरस्कार : जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add