नंदुरबार l प्रतिनिधी
ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती नंदुरबार जिल्हा संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या दिशानिर्देशानुसार नंदुरबार जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी मंत्री भारती पवार यांची जन आशिर्वाद यात्रे दरम्यान भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. भेटीदरम्यान पेंन्शनवाढ तसेच इतर ३ मुख्य मागण्यांसंदर्भात नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोरख माळी, जिल्हा सचिव परमेश्वर चव्हाण, संघटना सदस्य इंजिनिअर श्री.बरे, एम.एस.ई.बी व आदिवासी विकास महामंडळ सेवानिवृत्त कॄती समितीचे मुख्य संघटक खंडुसिंग राजपूत, निंबा ईशी व सुदाम वरसाळे यांनी निवेदन दिले. सदर प्रश्न आपण भारत सरकारच्या मंत्री व महाराष्ट्रातील प्रमुख महिला नेत्या म्हणून लवकर निकाली काढावा अशी विनंती केली. सदर प्रश्न सरकारच्या समोर चर्चेत असून त्यावर सकारात्मक विचार होईल, असे भारती पवार यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.