नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची नंदुरबार शहर महिला कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात नंदुरबार शहराध्यक्षपदी उषाताई वळवी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काॅग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने,नंदुरबार निरिक्षक श्रीमती मिनाक्षी चव्हाण यांच्या सुचनेने,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला जिल्हाध्यक्षा ॲड. सौ अश्विनी जोशी यांच्या सहकार्याने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची नंदुरबार शहर महिला कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात नंदुरबार शहराध्यक्षपदी उषाताई वळवी यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची नंदुरबार शहर महिला कार्यकारिणीत सरचिटणीसपदी मोनिका सोनार, नंदुरबार शहर उपाध्यक्षपदी नीलोफर पिंजारी,पुनम मराठे, हेमांगी देवरे, वंदना मराठे.शहर चिटणीसपदी लीलाताई सोनवणे, कोषाध्यक्षपदी अर्चना श्राॅफ, शहर समन्वयकपदी जयश्री पाटील, शहर संघटकपदी राजश्री पाटील, सहसंघटक म्हणून योगिता पाटील, कार्यकारणी सदस्य म्हणून संगीता पाटील,सुनिता शिंपी, मीना सूर्यवंशी, मंगला सोनवणे, जयश्री तांबोळी, सरला केदार, मेघा मराठे, प्रियंका तांबोळी, प्रियंका माळी, सुमित्रा तांबोळी, पुनम भक्तपुरी, भारती दिलीप, लता अहिरे, लक्ष्मी मराठे,
यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनियुक्त महिला पदाधिकारी यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष ॲड.अश्विनी जोशी, नंदुरबार जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप,धडगाव- अक्कलकुवा विधानसभा प्रभारी संगीता पाडवी, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे,महिला जिल्हा उपाध्यक्षा कुशल मोरे, जिल्हा सदस्य श्रीमती कांचन मोरे, निलेश चौधरी,हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.