तळोदा | प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळोदा प्रखंड व्यापक बैठक दत्त मंदिर हातोडा रोड तळोदा येथे झाली. प्रखंड बैठकीत सुरुवातीला भारत माता पूजनाने करण्यात आली. या बैठकीत लातूरचे देवगिरी प्रांत सहसेवा प्रमुख संतोष कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, प्रखंड अध्यक्ष प्रा.राजाराम राणे हे मंचावर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला त्रिवार ओमकार विजय मंत्र शहर मंत्री पवन शेलकर यांनी घेतला. यावेळी मान्यवरांचा परिचय व प्रास्ताविक प्रखंड मंत्री दिपक चौधरी यांनी केले.
या बैठकीच्या पहिल्या सत्रात विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी सांगितले की, विश्व हिंदू परिषद वर्धापन दिवस हा पूर्ण प्रखंडात, प्रत्येक ग्राम समितीवर व्हावे. त्यात काय करावे याचे नियोजन करून कोरोना बद्दल माहिती दिली. तर दुसऱ्या सत्रात
विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री अजय कासार यांनी बजरंग दल वर्ग, दुर्गा वाहिनी वर्ग, परिषद शिक्षक वर्ग कोणत्या वयोगटात करावे याबद्दल संपूर्ण माहिती दिली. तर तिसऱ्या सत्रात प्रा.राणे यांनी कोरोनाची तिसरी लाट बद्दल माहिती व उपाय सांगितले. व
२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात होणारे कोठारी बंधू शहीद दिवस निमित्त रक्तदान शिबिराचे नियोजन केले. तसेच चौथ्या सत्रात विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत सहसेवा प्रमुख संतोष कुलकर्णी यांनी सांगितले की, संपूर्ण तालुक्याच्या ग्रामसमिती दोन वर्षात कशी पूर्ण करता येईल हे सांगितले व कार्यकर्ता या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी नूतन तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी घोषित केली. यात शहर कार्यकारणीत अध्यक्ष मुकेश जैन, उपाध्यक्ष मुकेश सूर्यवंशी, मंत्री पवन शेलकर, बजरंग दल संयोजक अजय परदेशी, बजरंग दल सहसंयोजक पवन सोनवणे, मठ मंदिर प्रमुख धवल मेहता तर तळोदा प्रखंड कार्यकारणीत
अध्यक्ष प्रा.राजाराम विठ्ठल राणे, उपाध्यक्ष छोटू सुपडूसा कलाल,कार्याध्यक्ष डॉ.शांतीलाल काशिनाथ पिंपळे, मंत्री दीपक मोतीलाल चौधरी, सहमंत्री भूपेंद्र अशोक बारी, संयोजक कुशाल कोचऱ्या पाडवी, सहसंयोजक विलास भरत पाटील, दुर्गा वाहिनी कु.मनिषा राजेश मोरे, मातृशक्ती सौ.रुखमा सजन महाले, सेवा प्रमुख शांतीलाल लक्ष्मण साळुंखे, गोरक्षा प्रमुख संजय सेना जावरे, मठ मंदिर प्रमुख अश्विन हरीश पाटील, विशेष संपर्क प्रमुख प्रशांत नानासिंग राजपूत ही कार्यकारणी जाहीर केली. आभार प्रदर्शन दिपक नाना चौधरी यांनी मानले. तर शेवटी पसायदान व जय घोष पवन शेलकर यांनी म्हटले.