Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

team by team
August 23, 2022
in क्राईम
0
जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

नंदूरबार l प्रतिनिधी

31 ऑगस्ट 2022 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे . गणेशोत्सव काळात गणपती मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप , स्टेज उभारणी करणे , गणेश मंडळाची स्थापना करणे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते.

त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक खिडकी योजना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .

गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या परवानगीसाठी गणेश मंडळांनी https://www.mahapolice.gov.in/ या संकेतस्थळावर जावून नागरिकांसाठी विभाग याला क्लीक केल्यानंतर नागरिकांसाठी सेवा यावर क्लिक करावे . त्यानंतर Ganesh Festival Permission Application यावर क्लिक केल्यानंतर Create citizen login यावर माहिती भरल्यानंतर submit करावे .

ऑनलाईन अर्ज सुविधा एक खिडकी योजनेद्वारे करता येईल . गणेशोत्सव मंडळाकडून मंडप , स्टेज किंवा गणेश मंडळ स्थापन परवानगी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क नसल्याचे नंदुरबार जिल्ह्य पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी सांगितले , ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित गणेशोत्सव मंडळ ज्याठिकाणी गणेश मंडळाची स्थापना तसेच स्टेज , मंडप किंवा इतर देखावे उभारणार आहे , त्या जागेची संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पाहणी केली जाईल .

पायी ये – जा करणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना त्रास होणार नाही याची खात्री केल्यानंतरच संबंधित गणेश मंडळाला परवाना दिला जाईल . तसेच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मंडळ स्थापन करतेवेळी परवानगी घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्यापासून सुरुवात करुन चिराग मशिद , ईलाही चौक , फडके चौकी , जळका बाजार , दोहशाह तकिया व सोनी विहीर पर्यंत पायी फिरुन पाहणी केली . गणपती विसर्जन मार्गाची पाहणी दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मिरवणूक मार्गामध्ये महत्वाची ठिकाणे , धार्मिक स्थळे , उभारण्यात येणारी बॅरिकेटिंग यांची पाहणी करुन महत्वाच्या सुचना दिल्या .

तसेच बंदोबस्ताची आखणी कशा प्रकारे असेल याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले . सदर मार्गाची पाहणी करतेवेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे सह नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे ,

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव , शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे , पोलीस निरीक्षक अर्जुन पटले , उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती

Next Post

नंदुरबार शहर नाभिक समाज पंचमढी ट्रस्टतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी, 38 दात्यांचे रक्तदान; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add