नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील भारती सुभाष कोळी या विवाहितेस पती सुभाष लोटन कोळी याने घटस्फोट पाहीजे असेल तर माहेरहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरीक व मानसिक छळ केला.
तसेच चार वर्षापासून माहेरी सोडून निघून गेला. याबाबत भारती कोळी यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात सुभाष कोळी याच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र सुर्यवंशी करीत आहेत.








