तळोदा l प्रतिनिधी
आदिवासी जमातीच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असणारी संस्था युएनडीपीचे शिष्टमंडळ सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तळोदा तालुक्यातील कोठार येथे आले होते. गावातील आदिवासी बांधवांच्या रूढी,परंपरा, संस्कृती,लोकजीवन,शासनाच्या विकास योजना व लाभ या विषयांवर संवाद साधला.
केंद्र शासनाच्या युनायटेड नेशन डेव्हलप प्रोग्राम अंतर्गत हा अभ्यास या शिष्टमंडळाचा हा अभ्यास दौरा होता. या शिष्टमंडळात वन अधिकारी सुरेंद्र कुमार (आयएफएस), दिल्ली येथील युएनडीपीच्या डॉ.रुची पंत,सुनिल पाढळे,पोर्टफोलिओ अंगरिका यांच्यासह संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधि मिस मरीन या होत्या.या शिष्टमंडळासोबत उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार गिरीश वखारे,तळोदा वनक्षेत्रपाल स्वप्निल भामरे,तांत्रिक सहायक संजय धनगर, मिशन हायस्कूलच्या प्राचार्य चंदना नाथानी, आदींचा समावेश होता.
यावेळी या शिष्टमंडळांनी कोठार येथे ग्रामस्थांची संवाद साधत सरकारी योजनांमुळे आदिवासींना कोणकोणते लाभ झाले जीवनात कोणत्या कोणत्या प्रकारचे बदल झाले या संदर्भात तसेच रूढी परंपरा, सण उत्सव, जीवन पद्धती इत्यादी विषयी माहिती जाणून घेतली.
याशिवाय शेती करण्याची पद्धती व उदरनिर्वाहाचे साधनांबाबत देखील माहिती घेतली.जमिनीची कमी होत जाणारी उत्पादक वाढविणे, जनावरांचे कमी होत जाणारे प्रमाण रोखणे व त्यावरील उपाययोजना याबाबत देखिल त्यानी ग्रामस्थांशी चर्चा केली.शासनाकडून राबविले जाणाऱ्या योजना,
रोजगार हमी योजना, जॉबकर्ड संबधी महिती जाणून घेतली.शासनाकडून काय अपेक्षित आहे.या प्रसंगी कोठार येथिल ग्रामस्थ जंगलसिंग पाडवी, मोतीलाल पाडवी, वसंत नाईक, बटूसिंग पाडवी, बालुसिंग पाडवी, आदीं उपस्थित होते.यावेळी फ्रान्सच्या मिस मरीन यांनी कोठार येथील नागरिकांशी संवाद साधला.








