नंदूरबार l प्रतिनिधी
कै.सौ.यशोदाबाई सुरेश घाटे यांचा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त घाटे परिवार व भगवान बिरसा मुंडा ब्लड फाऊडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन महापुरुषांचे प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून करण्यात आले सदर कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ निलेश वळवी, डॉ सुनिल गावित,रतिलाल चौधरी , अँड.जयकुमार पवार, अजहर मिया ,मोहिनी राज राजपूत , राजू वळवी , दिनेश माळी , अजय माळी, अनिल ठाकरे, मुकेश घाटे, राजेश वळवी यांचा सह घाटे परिवार व भगवान बिरसा मुंडा ब्लड फाऊडेशनचे असंख्य मित्र परिवाराचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सदर रक्तदान शिबिरात 21 रक्त दात्यांनी रक्तदान केले विशेष बाब म्हणजे घाटे परिवारातील 11 रक्तदात्यांनी पहिल्या वेळेस रक्तदान केले.








