नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील 12 गावातील 17 शिक्षकांनी टीईटीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याच उघड झाले असून त्यांची आयडी गोठवुन ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत 2019 मध्ये गैरप्रकार झाला होता. नंदुरबार जिल्ह्यात 17 शिक्षकांची नावे अपात्रच्या यादीत आल्याने या सर्व शिक्षकांचे आयडी पुढील आदेश येईपर्यंत गोठवण्यात यावेत, तसेच ऑगस्ट महिन्याचे वेतन त्यांना अदा करण्यात येऊ नये, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आला आहे.
यात नंदुरबारसह जिल्ह्यात वैंदाणे, दुधाळे, लहान शहादे, खापर, प्रकाशा, फेस, आमोदा, लोणखेडे, आमली पुनर्वसन, लोणखेडा व नवापूर या 12 गावांमध्ये असलेल्या शाळांतील 17 शिक्षकांचा अपात्र ठरलेल्यांमध्ये समावेश आहे.








