Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिंंदु सणांच्या वेळी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

team by team
August 22, 2022
in राज्य
0
हिंंदु सणांच्या वेळी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

नंदुरबार  l  प्रतिनिधी

केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करुन हिंदूंशी पक्षपात करणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांची शीव (मुंबई) येथील कार्यालयात भेट घेतली.

या वेळी ‘ हवा प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांना हिंदु जनजागृती समितीचे अभिषेक मुरुकटे आणि रोहिदास शेडगे यांनी निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यावर डॉ. मोटघरे यांनी ‘या निवेदनाचा सविस्तर विचार करून येत्या पंधरा दिवसांमध्ये लिखित स्वरूपात उत्तर देऊ’, असे आश्वासन दिले.

गणेशोत्सव, दिवाळी, होळी आदी अनेक हिंदु सण-उत्सवांच्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषणाच्या नोंदी तासातासाला घेतल्या जातात, त्यांचे अहवाल बनवले जातात, ते संकेतस्थळावर प्रसिद्धही केले जातात; मात्र वर्षातील 365 दिवस प्रतिदिन 5 वेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे प्रचंड ध्वनीप्रदूषण होते, तसेच बकरी ईद, मोहरम आणि अन्य धर्मिय वा पंथीयांच्या सण-उत्सवांच्या वेळी होणार्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरातील सर्वेक्षण करावे, त्याचे अहवाल बनवावेत आणि ते मंडळाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करावेत, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. यासह या अहवालानुसार घडलेल्या गुन्ह्यांवर कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. या वेळी विधी अधिकारी अधिवक्ता श्रीमती नित्रा चाफेकर, उपप्रादेशिक अधिकारी जे. एस. हजारे, तसेच शीव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन बोराडे हेही उपस्थित होते.

वर्ष 2015 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत ध्वनीप्रदूषणाबाबत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर 230 खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ 22 खटले दाखल आहेत’, असे माहिती अधिकारातून माहिती हिंदु जनजागृती समितीने पत्रकार परिषद घेऊन उघड केली होती. या मागण्यांची दखल न घेतल्यास आम्हाला नाइलाजास्तव रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही शिष्टमंडळातील सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेतर्फे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना पेढे वाटून आनंदोत्सव

Next Post

17 शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखले, टीईटीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याच उघड

Next Post
17 शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखले, टीईटीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याच उघड

17 शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखले, टीईटीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याच उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add