नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून कशिष विजय चौधरी ही विद्यार्थीनी सर्वाधिक गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तिचा सत्कार जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.पाटील,मुख्याध्यापिका सुषमा शाह,उपमुख्याध्यापक राजेश शाह,पर्यवेक्षक जगदीश पाटील,मुकेश शाह अदि उपस्थित होते.या विद्यार्थिनीला परीक्षे अंतर्गत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. केंद्र शासनातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एन.एम.एम.एस.ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होत असते. ही परीक्षा एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आली होती. शाळेतील प्रवेशित ७४ पैकी २८ विद्यार्थ्यांनी गुणानुक्रम मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत कशिष विजय चौधरी हिने १२२ गुण मिळवीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय ऋषी प्रशांत सोनवणे, दीप योगेश पाटील,अक्षिता संतोष बेडसे, तुषार हेमराज बागुल, सितल दशरथ राठोड, प्रियंका गजेंद्र चौधरी, प्रसन्न मुकेश चौधरी हे आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे परीक्षा प्रमुख मुकेश शाह यांनी मार्गदर्शन केले.यशस्वीं विदयार्थ्याचे मुख्याध्यापक सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील यांनी कौतुक केले आहे.