नंदुरबार । प्रतिनिधी
धुळे शहर वाहतूक शाखेने कारवाई करून जप्त केलेल्या कर्णकर्णश आवाज करणार्या सायलेन्सरसह दादा, मामा, नावाच्या नावांच्या 32 नंबर प्लेटांवर व हॉर्नवर आज संतोषी माता चौकात रोडरोलर फिरविला. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने ही कार्यवाही करण्यात आली
धुळे शहरातील अनेक बुलेट दुचाकी धारकांनी कंपनीने दिलेल्या सायलेन्सर ऐवजी कर्कश आवाज करणारे मॉडीफाईड सायलेन्सर बसवुन शहरात ध्वनी प्रदुषण करतात. अशा एकुण 29 बुलेट धारकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करुन त्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर शहर वाहतुक शाखेत येथे जमा करण्यात आले होते. तसेच काही दुचाकी चालक नियमाप्रमाणे वाहनास नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट (दादा,अण्णा, मामा,काका) अनाधिकृत 32 नंबर प्लेट वाहन चालकांवर कारवाई करुन त्यादेखील जमा करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे ध्वनी प्रदुषण करणारे कर्कश (म्युझिकल) हॉर्न वापरणारे 7 वाहन धारकांवर कारवाई करुन ते म्युझिकल हॉर्न ही जमा करण्यात आले आहेत. असे एकुण जप्त करण्यात आलेले 29 मॉडीफाईड सायलेन्सर, 32 फॅन्सी नंबर प्लेट, 7 म्युझिकल हॉर्नवर पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये आज सकाळी संतोषीमाता चौक रोड रोलर फिरवुन नाश करण्यात आले आहेत.
ही विशेष मोहिम पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक धिरज महाजन, सपोनि संगीता राऊत, उपनिरीक्षक रामदास जाधव व शहर वाहतुक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार यांनी राबविली होती. दरम्यान महिन्यात 54 लाखांचा दंड वसूल जानेवारी 2021 ते माहे जुलै 2021 अखेरपर्यंत शहर वाहतुक शाखेतर्फे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्या 33 हजार 200 वाहन चालकांवर मो.व्हि.अॅक्ट प्रमाणे कारवाई करुन 54 लाख 94 हजार रोख तडजोड शुल्क वसुल करण्यात आले असुन 53 लाख 77 हजार 700 रूपये इतके तडजोड शुल्क अपडेत आहे. अपडेट तडजोड शुल्क वसुलीसाठी वाहन धारकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे देखील जे वाहन चालक मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे. तरी कोणीही मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करु नये, अन्यथा वरप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाहतूक शाखेने दिला आहे.